अधिकार
मी म्हणत नाही कि तू माजी हो
फक्त म्हणणे आहे जशी आहे तशीच राहा
माझा हट्ट नाही कि तुझे माझ्यावर प्रेम असू दे
हट्ट आहे इतकाच मनाच्या नदीवरील तुझे प्रतिबिंब तसेच राहू दे
मला माहित आहे कि ते डोळे माझी वाट कधीच बघत नाही
पण माझे डोळे तुझी वाट मात्र कधीच चुकवत नाही
मला माहित आहे कि माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर हसू कधी खुलून येत नाही
पण माझ्या चेहऱ्यावरच्या हसण्याला तुझ्या शिवाय कधीच शोभा येत नाही
तुझे कान कोणाच्यातरी चाहुलीची वाट सतत पाहत असतात
माजे कान मात्र तुझ्याच आवाजची पारायणे सतत करत असतात
तुझ्या विचारांच्या गर्दीतला मी फक्त एक चेहरा असतो
माझ्या विचारांची गर्दी मात्र तुझ्या चेहऱ्या भोवतीच असते
प्रयत्न मी केले कि हे सर्व विसरायचे आणि कान डोळे बंद करायचे
विचारांना हि वाऱ्यासोबत बांधून आता पुढे निघायचे
पण काय करू मी माझ्या विचारांना आणि या वाऱ्याला जणू दुसरा रस्ताच माहित नाही
आखे जग फिरून सुद्धा यांना दुसरे कोणी आवडतच नाही
आता मात्र ठरवले इथून आता सर्व नवीन सुरु करायचे
कान डोळे आणि मन सर्वाना समजवायचे
कि माहित आहे तिच्या हृदयावर दुसऱ्या कोणाचा तरी अधिकार आहे
पण त्या गोड आठवणीतल्या तिच्यावर फक्त आपलाच अधिकार आहे
किरण कुंभार