केव्हा कधीतरी.........
केव्हा कधीतरी एक अल्वार्शी झुळूक येते
डोळ्यात पाणी अन मनात आठवणी आणते
तू असलास तर असा बोलला असतास ,असा केला असता ,का जाने उगाच वाटून जातं
एक एक पदर उलगडला की माझाच मना मलाच खात
तुझ्या स्पर्शाचा शहारा अजूनही अंगावर काटा आणतो
माझ्या मनाला,स्वप्नाच्या जगात घेऊन जातो
क्षणाच्या अवधीत मन मात्र थार्यावर येतं
स्वाप्नाच्या जगातून सत्यात अलगद घेऊन जातं
वेडं मन समजावतं स्वताला,मृगजळ कोणाला कधी मीळत का?
माहित असून पणहे स्वप्ना मला असं छळता का?
तूझं हसू ,तुझा राग,सारंच आता परक झालंय
तुज्या वाचून माझं मन मात्रं पोरकं झालंय......