पावसाच्या पाण्यात पाऊस स्वतःच भिजुन
सांगतो जणू बघ एकदा परत जगुन
पान ओले खोड ओले ... ओलीचिंब झाडे
भिजलेल्या मातीवर पुन्हा गवताचे सडे
लेऊन साज झाड उभे हिरव्या शालूत सजून
पावसाच्या पाण्यात पाऊस स्वतःच भिजुन ......
वारा आणि सरींचा मग सुरु होतो खेळ
खोलवरच्या आठवणींचा मग बसू लागतो मेळ
पाऊस हा मनीचा मग डोळ्यातच रोखून
पावसाच्या पाण्यात पाऊस स्वतःच भिजुन ......
भारलेला मेघ नभी मन व्यापुन जाई
वाकलेल्या फांद्याही जणू सांगतात काही
तुझी साथ नसताना सुचते असेच काही ..
भिजतो मी आजही पण मन कोरडे राही
आस आहे चंद्राची ... तो थांबेल पलीकडे अजून
पावसाच्या पाण्यात पाऊस स्वतःच भिजुन ......