त्यादिवशी रात्री तिचा अचानक मेसेज आला.मला खुप बरे वाटले. मी विचार केला कालचे भांडण ती विसरली असेल पण माझ्या विचारांचा चक्काचूर झाला कारण तो ब्रेकअपचा मेसेज होता. ते वाचल्यावर मी जास्त मनावर दडपण न घेता लगेच रिप्लाय केला: चालेल.
तिला माझा रिप्लाय बघून हेच वाटलं असणार की मला काहीच फरक पडत नाही तिच्या जाण्याने. पण तिला काय माहित....माझी काय हालत झालेली, मनातून मी खुप खचलेलो.
एवढा वेळात तिचा एकही रिप्लाय आला नाही, म्हणून मी झोपण्यच्या तयारीत होतो. तेवढ्यात पुन्हा एक मेसेज माझ्या इनबॉक्स मध्ये आला, लिहिले होते कीः
"प्रेम हे एका धनुष्याच्या बाणासारखा आहे. तो बाण सरळ समोरील व्यक्तीच्या ह्रदयाचा वेध घेतो. हा बाण ह्रदयात घुसताना काहीच वाटत नाही, पण काढताना मात्र अतोनात यातना देऊन जातो."
तिचा मेसेज वाचुन कळले की तिला खुप दुःख झाले आहे. पण तिला झालेल्या यातना मलाही झाल्याच होत्या. म्हणुन मी लगेच रिप्लाय केलाः
"प्रत्येकाच्या जीवनातून प्रेमाचा बाण एकदाच धनुष्यातून सुटतो,माझ्याकडुनसुध्दा सुटला. पण तो निष्फळ ठरला. एकदा सुटलेला बाण कधी पुन्हा येतो का?"
त्यानंतर तिचा कधी रिप्लाय नाही आला आणि मी सुध्दा तसा प्रयत्न कधी केला नाही.
तात्पर्य: प्रेमाच्या त्या बाणाला नेहमी ह्रदयात जपुन ठेवा कारण काढण्याचा प्रयत्न केला तर मिळतात त्या फक्त यातना!!!!!
Unknown कवि