Author Topic: असा पाऊस तसा पाऊस.  (Read 2305 times)

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
असा पाऊस तसा पाऊस.
« on: June 29, 2011, 10:10:47 AM »
त्याच्याकडचा पाऊस

अरे थोड्या वेळ थांब येऊ दे तिला,
कोणीतरी सांगाना या वेड्या पावसाला.

कित्येक दिवसांनी हि भेट होणार,
त्याला सांगा थांब, नको येऊ अडवायला.

नेहमी असेच होते, माझे फसेच होते,
तुला का आवडते असे मला चिडवायला.

किती वेळ गेला असाच कोरडा कोरडा,
आताच सुचले कसे तुला तिला रडवायला.

नकोसनारे होऊ इतका कठोर तू,
तूच कारणीभूत होतास हि प्रीत घडवायला.

एकदाच तिला येऊ दे अन मिठीत घेऊ दे,
मग नाही सांगणार कधी तुला जायला.

एकाच झाडाखाली निशब्द आम्ही असताना,
ये ना मग खुशाल हवे तसे भिजवायला.

कश्याला फुलवतोस हा निसर्ग सारा,
तुला तरी आवडेल का यात एकटे मिरवायला.

तुझे नावंच सांगतो फक्त येऊ दे तिला,
सांगतो तुझा कान धरून तुला ओरडायला.

अरे प्लीज तिला एकदाच येऊ देरे,
मग ये हवा तसा आणि हवे तितके राहायला.
-----------------------------------------------------------------------
तिच्याकडचा पाऊस

किती रे हा पाऊस कशी बाहेर येऊ,
तूच सांग घराबाहेर कसे पाऊल मी ठेऊ.

हा उलट सुलट वारा उधळतो छत्री,
आणि थांबेल कि नाही याचीही ना खात्री.

तू पण राजा ऐक नको राहूस भिजून,
संपल्यावर मीच येईन धावत इथून निघून.

हा निरोप लिहिल्या कागदाची सोडते हि होडी,
आज भेट नाही यावरच मन गोडी.

शपथ तुम्हा सारिंनो नका भिजवू हि नांव,
तुम्हीच करा सोबत हिला गाठायचे दूर गाव.

तुही कागदा ठेव जपून ह्या अक्षरांची शाही,
त्याला भेटल्याशिवाय बघा विरघळायचं नाही.

शब्दांनो जाऊन तुम्ही समजूत त्याची काढा,
सर्दी होईल म्हणावं त्याला आधी घरी धाडा.

तो जरा हट्टी आहे, त्याला सांभाळून घ्या,
ह्या घडीत दुमडलेले काळीज जपून जरा द्या.

माझ्याही डोळ्यात साचलेल्या आसवांच्या रांगा,
त्याला शपथ आहे जाण्याची इतकं फक्त सांगा.
 
...अमोल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
Re: असा पाऊस तसा पाऊस.
« Reply #1 on: June 29, 2011, 10:36:33 AM »
khup chan

Offline shashikalare

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: असा पाऊस तसा पाऊस.
« Reply #2 on: June 29, 2011, 01:24:52 PM »
very nice

Offline राहुल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
 • Gender: Male
Re: असा पाऊस तसा पाऊस.
« Reply #3 on: June 29, 2011, 08:51:31 PM »
Ekdum chaan....

Offline anolakhi

 • Jr. Member
 • **
 • Posts: 79
 • Gender: Male
  • http://www.durava.blogspot.com
Re: असा पाऊस तसा पाऊस.
« Reply #4 on: June 30, 2011, 08:51:06 AM »
माझ्याही डोळ्यात साचलेल्या आसवांच्या रांगा,
त्याला शपथ आहे जाण्याची इतकं फक्त सांगा.


liked....

Offline anilsk04

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: असा पाऊस तसा पाऊस.
« Reply #5 on: June 30, 2011, 01:34:12 PM »
mast ahe kavita..................................

Offline • » נєєт « • εﺓзस्वप्नातील राजकुमार मी♡♡♡

 • Newbie
 • *
 • Posts: 6
 • Gender: Male
 • » נєєт « • εﺓзस्वप्नातील राजकुमार मी♡♡♡
Re: असा पाऊस तसा पाऊस.
« Reply #6 on: July 02, 2011, 11:12:01 AM »
very nice broooooooooo...keep it up

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: असा पाऊस तसा पाऊस.
« Reply #7 on: July 02, 2011, 03:47:14 PM »
aprtim .......... mala khup khup khup avadali hi kavita ............... keep writing n keep posting ..... :)

Offline anolakhi

 • Jr. Member
 • **
 • Posts: 79
 • Gender: Male
  • http://www.durava.blogspot.com
Re: असा पाऊस तसा पाऊस.
« Reply #8 on: July 02, 2011, 04:25:01 PM »
एक पाउस असाही मनी मूस-मुसतो..
डोळ्यांचा बांध तुटता अनिमिष बरसतो..

Offline Varsha Singh

 • Newbie
 • *
 • Posts: 5
Re: असा पाऊस तसा पाऊस.
« Reply #9 on: July 04, 2011, 12:33:04 PM »
aprateem... lovely poem... thank u for posting  :)