मनाच म्हणजे मेघांसारखं असतं
मेघ भरून आल्यावर बरसतात
मन भरून आले कि मग डोळे भरून येतात
आणि डोळे भरून आले की ....
कधी कधी नाही बरसत डोळे
पाऊस बरसला तर झेलायला धरा असते
पण अश्रू टिपायला कोणी नसेल तर ....
मग डोळ्यांतील दाटलेले मेघ मनातील वादळा बरोबर विरून जातात
पाऊस तसाच बरसत राहतो
डोळ्यांचे कोरडेपण पापणी लवू देत नाही
नजर कुठेतरी शून्यात खिळून राहते
आणि मन कुठेतरी काळोखात बुडून जाते ......