किती गं वाट पहावी.....?

या वेड्या दिलाने तुझी ही सांग किती गं वाट पहावी,
मी तिळ-तिळ मनी तुटावे, तू अवखळ गाली हसावी..... ॥ २॥
तुझ्या आल्हाद सरींसाठी मी मेघ मल्हार गावे..... ॥ २॥
दावुनि भास टिपांचा तू कधीच ना बरसावी.....?
या वेड्या दिलाने तुझी ही सांग किती गं वाट पहावी.....?
नजरेत सदैव माझ्या एक ओढ तुला पाहण्याची,
जी ओढ ऊरी ह्या आहे ती ओढ तुला का नसावी.....? ॥ २॥
चेहरे सभोवती अनेक दिसतात हजार कैक.....॥ २॥
लहरी मनास माझ्या त्यात तुच तुचं का दिसावी .....?
या वेड्या दिलाने तुझी ही सांग किती गं वाट पहावी.....?
डोळ्यांतील आसवे ही कवितेत सांडिली मी,
टाळ्यांचाही ना रुचावा नाद, जर दाद तुझी ना यावी..... ॥ २॥
हररोज सांजकाळी मी ऊगा तुला चिंतावे.....॥ २॥
निष्ठूर ह्रिदयी तुझिया माझी याद ही का गं ना यावी.....?
या वेड्या दिलाने तुझी ही सांग किती गं वाट पहावी.....?
भूतकाळ वाहिला मी, पुसले स्वतःचं डोळे,
जाहलो जरी कोरडा आतून मात्र मन ओले.....॥ २॥
ओलाव्यात अंतरिच्या ह्या गारवा तुझाच असावा.....॥ २॥
शहारुन टाकाया मजला तू झुळुकही ना व्हावी.....?
या वेड्या दिलाने तुझी ही सांग किती गं वाट पहावी.....?
निजताना रोज रांती रातराणी तुझी बहरावी,
उधळून गंध सारा निशा माझी मंथरून जावी.....॥ २॥
होवुनी पिसा-एकला तुला दाही दिशांस मी धुंडावे.....॥ २॥
जाणवे अस्तित्व तुझे हे मनाला पण तू कुठे कूठेच ना दिसावी.....?
या वेड्या दिलाने तुझी ही सांग किती गं वाट पहावी.....?
[/size]
...........महेंद्र डापले
[/size][/pre]