तुला नाही म्हणताना माझे डोळे भरून आले
मी काहीच बोललो नाही तुला सगळे कळून गेले
तू तुझ्या वाटेने, मी माझ्या निघालो
क्षण गलितगात्र , आभाळ भरून आले
पाउस येणार नक्की होतं, डोळ्यातला पाउस बरसला होता
भिजण्याची खंत कुणाला, सगळा क्षण भिजला होता
कडाडता विजा जणू माझ्या हृदयाची साद होती
पाउसातून चालताना फक्त तुझी साथ होती
आता हात रिकामा चेहऱ्यावरण फिरत होता
मनातले पावसाळे डोळ्या वरन पुसत होता
आता फक्त ओल्या खुणा मातीत अन मनात
नाते जन्म जन्माचे संपले एका क्षणात
मैत्रेय (अमोल कांबळे)