कविता वाचता वाचता...
जुन्या आठवणींत गुंतून गेलो....
गुंतलाच तर ...
बाहेर येता येता .....
विसरलेले काही घाव पुनः बाहेर घेउन आलो...
लपून शांत बसलेले ते घाव....
पुन्हा...
त्याच आधीच्या तीव्रतेने दुखू लागले...
पुन्हा एकदा जीवंत होउन -- खूनाचे अश्रू बहावू लागले....

जेव्हा हे असहनीय झाले तेवहा....
न कळताच ......
माझ्या मनात एक प्रश्न आला....---
"का लिहतात हे कवी --
अशी कविता ज्याने---
लपलेले घाव पुन्हा जीवंत होतात?" .......
तेव्हा त्या माझ्या जखमी हृदयाने- उत्तर दिले --
" भरले आहेत त्यांचेही हृदय --
असल्या हजारो घावांनी...
म्हणूनच .....
त्यांची लेखनीही 'असे' - खूनाचे अश्रू रडतात...."
- चेतन...