तळ्याकाठी सांजवेळी भेटीसाठी येशील का ?
साथ तुझी हाथ तुझा कातरवेळी देशील का ?
पण अता सतत एकच प्रश्न सतावत आहे ,
आठवणींच पानी हे फक्त माझ्याकडेच का वाहत आहे
एकाकी......
एकटाच..............
एक विचारू जरी तू माझी नाही ना होऊ शकली तरी एकदा मला भेटायला येशील का?
शरीरातला प्राण जाण्या अगोदर............
डोल्यातील अश्रू सुकन्या अगोदर.....
फक्त एकदाच येशील का.........पुन्हा परतून लांबवर चालत येऊ नकोस, फक्त एकदा मागे वळून बघ.............
मी आहे इथेच......अगदी एका श्वासाच्या अंतरावर.....
परत एकदा भेटशील का

?येशील का

??
फ़क्त तू मी अन् ती सांजवेळ .......
चेतन र राजगुरु
(स्वछंद टाकाऊ कागद)