जातो आहेस म्हणत नाहीस..
इथेच आहेस भासवतोस..
तरी मैल मैल दूर असल्यासारखं का जाणवतं???
उत्तर हवयं मला याचं..
देशील का?
कधीच निघून गेलायस का???
तुझं जाणही जाणावलं नाही..
जातो आहेस हरकत नाही..
जाताना माझ्या अश्रुंचा हिशेब देऊन जा,
आठवणींत तुझ्या वाहून गेलेल्या जगाचा पंचनामा करुन जा..
माझं आयुष्य मला परत देऊन जा,
माझ्या गीतांमधले तुझे सुर घेऊन जा..
कवितांमधून माझ्या..
तुझे शब्द घेऊन जा..
जातो आहेस हरकत नाही..
पुन्हा कधीच येणार नाहीस असं ठरवून जा..