हि कविता कुठेतरी अपूर्ण वाटतेय मला.कवीची माफी मागून,भावनांना न दुखावताती अपूर्णता भरून काढायला आवडेल मला.......
एक "हसू"......
तू शिकवलेलं,
सहज जपलेल,
कायम सोबत करणार,
खूप आनंदी ठेवणार,
एक छंद,
तुझ्यामुळे लागलेला,
शब्दांना आपलेस करणारा,
मन जोडणारा,
वर्तुळ पूर्ण करणारा,
एक "स्वप्न".....
तू दाखवलेलं,
वेड करून पळवणार,
वर्तमानात जगवणार,
सत्यात उतरू पाहणार,
एक "नाते".....
धाग्यांमध्ये राहणार,
चिरंतन असलेल,
आयुष्यभर जपलेल,
तुझ्यासह आपल्यासाठी................
written by पल्लवी जाधव.