Author Topic: तुझ्यासाठी काही प्रश्न  (Read 3503 times)

Offline अमोल कांबळे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 100
  • Gender: Male
  • मी माझा मैत्रेय!
    • मी माझा मैत्रेय!
तुझ्यासाठी काही प्रश्न
आहेत माझ्या कडे
उत्तरांची अपेक्षा मज,
सुटेल का हे कोडे
का मुके झालेत वारे ?
आर्त गळून गेली पाने
का फुल येत नाही?
तू दिलेल्या गुलाबाला.
का पाखरे बोलत नाहीत ?
घरटे आपले सोडत नाहीत,
का घास भरवत नाहीत ?
भुकेल्या पिलाला,
का दिवस संपलेला
कळत नाही ?
का रात्र एकटी सरत नाही?
का चांदनि  फितूर झाली ?
अन डाग आला चंद्राला,
का तुला आता माझ्या
प्रश्नांचा राग येत नाही ?
का तुला माझी आठवण
येत नाही ?
का तू खरंच विसरलास
मला ?
का तू विसरलास वचन दिलेले
मला?
का शेवट पर्यंत बोलला नाहीस ?
का फक्त हसलास?
का असा निघून गेलास ?
कधी परत न येण्यासाठी,
का मला एकट केलंस
आयुष्यभर तडपण्यासाठी?
                                           मैत्रेय (अमोल कांबळे)


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):