दोस्तांनो ..
आपल्या आयुष्यात खूप गोष्टी घडत असतात ..
जेव्हा त्या भूतकाळात जमा होतात तेव्हा त्यांच्या आठवणी बनून जातात ,
अशाच काही आठवणी डोळ्यात आसू आणतात कधी ओठांवर हसू,,.
अशीच आठवण एखाद्या प्रिय व्यक्तीची मनाला वेड लावून जाणारी ...
प्रत्येक श्वासागणिक,
तुझ्या आठवणी जन्म घेत राहतात ..
आणि त्यांना मूर्तिमंत पाहताना
संवेदना तरल होत जातात..
एकटीच जगत होते या अनोळखी जगात ,
कुठेतरी तुझी चाहूल लागली ..
अन प्रत्येक क्षण मोहरून आला..
सुंदर आहे जगणं हे जाणावू लागलं..
तुझ्यासाठीच जगावं अन
तुझ्यासाठीच मरावं अस वाटू लागलं ..
पण ..
या जगातल्या सगळ्याच गोष्टी क्षणभंगुर ,
तसाच तुझा सहवासही ..
कोणत्यातरी अजाण क्षणी ,
तू माझ्या आयुष्यातून निघून गेलास ..
माझ्या आनंदी आयुष्याचं,
राखरखत वाळवंट बनवून ..
तुझं जाणं ठरलेलच होत जणू ,
म्हणूनच तुला दोषी ठरवणं नाही जमलं माझ्या मनाला..
आता तेच मन ,
तुझी वाट पाहतयं..आसुसून ..
तहानलेल्या चातकाप्रमाणे ,
कदाचित तू येशील अन ..
माझ्या तडफडणार्या मनाला चिंब सरींत भिजवशील..
तू येशील?
माझ्या आयुष्यात पुन्हा लाखो सूर्य घेऊन ?
पौर्णीमेचा चंद्र होऊन..
आमावस्येला चांदण्या आणि ..
भरतीच्या लाटा होऊन ,
तू येशीलाही कदाचित ..
कारण ,,
अजूनही माझ वेडं मन गाणं गातं ..
स्वप्नं रंगवत,
आणि तुझ्या आठवणींत स्वःताला हरवून बसतं ..
पण तू नाहीच आलास तर ..
या वेड्या मनाची समजूत कशी काढू मी ?
असे विचार मनात आल्यावर ,
डोळे पाणावतात ,
स्वप्नांची असंख्य शकले होतात..
अन जीवनातले खाचखळगे खूपच जास्त वाटायला लागतात,
तू माझ्या आयुष्यात नसण,
हे तर प्रत्येक क्षणाला मारण्यासारखं ..
पण तुझं नसण आता खोल कुठेतरी जाणवायला लागलय,,
म्हणूनच लवकर ये ..
माझ्या मनाचा बांध तटायच्या आधी ये..
अन उरात धडपडणारे श्वास थांबण्याआधी ये,
जीवनाची शिवण उसवण्याआधी ये..
लवकर ये..
मी तुझी वाट पाहतेय,,
क्षितिजापल्याड काहीतरी शोधतेय ,
शोधताना पडून ,ठेचकाळून ..
रक्तबंबाळ होतानाही ..
माझे श्वास तुझेच असतात
अन तुझे श्वास माझे..
निदान माझ्या स्वप्नांच्या अवकाशात ये ..
माझा आत्मा तुझ्याचभोवती रुंजी घालतोय ,
त्याच्यासाठी तरी ये ,.....
तू ये किंवा नको येऊ ,
पण माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत ..
मी तुझी अन फक्त तुझीच वाट पाहणार आहे..
कारण ..
या वेड्या मनाला ..
तुझी अन फक्त तुझीच ..
ओढ आहे..