जगू कसा मी मग स्वतःला सावरून
नाही जगू शकत आता मी तुला विसरून
कधी जगतो का मासा पाण्याला दूर करून
प्रेम केले जीवापाड मी तुला स्वतःला विसरून
आता रक्तात सुधा बसलेस तू तुझे घर करून
जगू कसा मी मग स्वतःला सावरून?
आपण पाहिलेली स्वप्ने कशी गेलीस तू विसरून
वाटत न्हवते राहशील कधी तू मला दूर करून
जगू कसा मी मग स्वतःला सावरून?
कुठे गेले ते सर्व वायदे जे दिले तू हाताला धरून
विसरलीस कसे ते गोढ क्षण जे घालवले एकत्र बसून
जगू कसा मी मग स्वतःला सावरून?
हरकत नाही आता गेलीस तू ते सारे विसरून
प्रकाश घेवून गेलीस इथे सर्व अंधार करून
जगू कसा मी मग स्वतःला सावरून ?
हो संग मला
जगू कसा मी मग स्वतःला सावरून ?
सुनील