Author Topic: तू म्हणायचीस.  (Read 2613 times)

Offline pralhad.dudhal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 118
  • Gender: Male
तू म्हणायचीस.
« on: August 16, 2011, 10:04:01 PM »
तू म्हणायचीस.
 
तू नेहमी म्हणायचीस
माणसानं कायम हसत रहावं
दुस-याच्या आनंदानेसुध्दा नाचावं
एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी व्हावं!
असच काही बडबडायचीस....
मला ही मनापासून सगळं पटायचं....
पण काय सांगू...
....आज...मी हसतो तेव्हा...?
लोक माझ्याकडे बघतात एक वेडा म्हणून
कुणाला आनंदात पाहून बेभान नाचतो तेव्हा...?
माझ्याकडे फेकले जातात दगड!
आणि...
सहभाग हवा होता....
तुझ्या सुखदुखा:त
पण...ती..
आधीच वाटली गेली आहेत!
      .....प्रल्हाद दुधाळ.
        काही असे काही तसे!

Marathi Kavita : मराठी कविता