मुसळधार पाऊस पडतो,
आणि तुझी आठवण येते,
पानां वरून थेंब ओघळतो
आणि तुझी आठवण येते.
लवलवतात पानं,
झाडहि मग शहारते
मी तिथेच असते उभी,
आणि तुझी आठवण येते.
स्पर्श होतो पावसाचा
अन काळी लाजाळू ची लाजते,
मी असते स्वप्नांच्या वाटेवर,
आणि तुझी आठवण येते.
थांबते मग वृष्टी,
झहाडा खालीच विसावते,
चिंब भिजलेल्या वटवृक्षाची
ती शरणागती पत्करते.
हे पाहून तू हसतोस
मी तुझ्या हसण्याने सुखावते
मग कलता तू नाहीसच इथे
आणि तुझी आठवण येते
स्मृतींचा गंध ओघळतो
आणि तुझी आठवण येते
मी जाते तुला विसरायला
आणि तुझी आठवण येते.