नुकतंच कोणीतरी ओट्याच्या फरशीवरून चालत गेलंय ओल्या पावलांनी,
त्या पावलांचे ठसेही उमटले आहेत फरशीवरती,
पण थोड्याच क्षणात हे देखील पुसट होतील,
कारण फरशीत तेवढी ताकदच नसते मातीएवढी ओलावा धरून ठेवण्याची,
अश्याच तुझ्या आठवणींचही होतंय,
मनाच्या गाभार्यात आल्या पावली निघून जातात त्या आजकाल,
त्यांमुळे आता हसावंसंही वाटत नाही कि रडावसंही वाटत नाही,
माझ्या मनाची देखील आता तशीच फरशी झाली आहे,
अगदी काळी, कठोर, कभिन्न.........
...........अमोल