Author Topic: माझी कविता आणि तू  (Read 1996 times)

Offline Saee

 • Jr. Member
 • **
 • Posts: 72
 • Gender: Female
 • Manakarnika
माझी कविता आणि तू
« on: August 23, 2011, 05:24:16 PM »
आज नव्यानेच पुन्हा येतीय तुझी आठवण,

प्रकर्षाने जाणवतीय तुझी उणीव,

शब्दांचे सारेच खेळ संपले,

आता उरल्या फक्त भावना,

एक अनोखी एकाकी पणाची जाणीव,

हा पाऊसही नवीनच,
तू इथे नाहीस हे सांगणारा,

तुझी मौनाची भाषांतरे,

मला एकांतात समजावणारा,

तू मात्र अद्न्यान,

माझ्या कवितां पासून गाफील,

आणि माझी स्वप्नं, तुझ्या आठवांना सामील,

मग इथेच संपते ही कहाणी,

तुझ्या माझ्या प्रीतीची, न लिहिलेली गाणी,

मग उरतो फक्त ..........

तुझ्यासाठी वेडी झलेली मी,

आणि माझी कविता,

अगदी तुझ्या इतकीच....... शहाणी......

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Gyani

 • Newbie
 • *
 • Posts: 18
 • Gender: Male
  • Gyani
Re: माझी कविता आणि तू
« Reply #1 on: August 24, 2011, 02:34:57 PM »
kavitecha shevat 1 no. great..
 

Offline prashant_athawale

 • Newbie
 • *
 • Posts: 12
Re: माझी कविता आणि तू
« Reply #2 on: August 27, 2011, 10:48:19 AM »
chhan