Author Topic: अनामिका  (Read 1552 times)

Offline santa143

 • Newbie
 • *
 • Posts: 15
अनामिका
« on: August 28, 2011, 07:11:51 PM »


खूप प्रेम केले मी तिच्यावर
पण तिला कळलेच नाही
बरोबर, प्रेम आंधले असतेना
म्हणूनच कदाचित.

ती म्हणाली होती एकदा
की तुझ्याशिवाय जगू शकत नाही
पण तरी ती सोडून गेली
अरे विसरली असेल कदाचित.

खरे प्रेम करणे म्हणजे काय असते
मला माहीतच नाही, मी केल ते की
तिने केल ते? तिने केल तेच
असेल कदाचित.

ती जात होती मला सोडून
मी नाही आडवल,कारण ती खुश
होती म्हणून, कळले असेल का
तिला कदाचित?

मी अजूनही गप्पच आहे
एकाच आशेवर,
येईल ती पुन्हा माझ्या आयुष्यात
कदाचित!!!!!!!!


संतोष भोसले

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Saee

 • Jr. Member
 • **
 • Posts: 72
 • Gender: Female
 • Manakarnika
Re: अनामिका
« Reply #1 on: September 02, 2011, 02:34:41 PM »
fantastic :)

Offline santa143

 • Newbie
 • *
 • Posts: 15
Re: अनामिका
« Reply #2 on: September 02, 2011, 03:45:11 PM »
thanks saee