धुंद होते आभाळ अन बहरली होती रात्र ,
परंतु त्या रात्रीत अस्तित्वच नाही माझे मात्र .
माझ्या सोबत ती नेहमीच असते,
परंतु माझ्या सोबत असूनही ती त्याचीच वाट बघते.
आपणही का नाही तयासारखे ,
... प्रेम आपणही करतो तिच्यावर वेड्या सारखे .
हा विरह सहन नाही होत आता ,
तो तर निस्तेज आहे मी आहे त्याच प्रकाशदाता.
मी नसेन तर काय आहे त्याचे महत्व ,
परंतु त्याच्यामुळेच तिच्या आयुष्यात आहे माझे अस्तित्व.