माझ्या जगण्यावर तुझा पहारा कशाला?
बेचव मि, त्यात तुझा गोड खारा कशाला?
भर सागरात काल फुटले जहाज माझे
त्याला पोचायला तुज किनारा कशाला?
जळजळीत दु:ख माझे पचवील एकटाच
मला तुझ्या आसवांचा सहारा कशाला?
वेदनांनी माझी लाहीलाही झाली
त्यांना शमायला तुज शितवारा कशाला?
भेसूर बडवतोय मी ढोल जीवनाचा
मग तुझ्या वीणेच्या सुरेल तारा कशाला?
मस्त आहे या गटारांच्या वासात मी
मज धुंद कराया तुझा मोगरा कशाला?