हे एक बरे झाले तुझेच म्हणणे खरे झाले,
तुझ्यानंतरही आठवणींचे सोहळे साजरे झाले.
मी ना रडलो ना खचलो विरहात कधीही,
संगतीत माझ्या दुख्खही हासरे झाले.
शरीराने नसलीस तरी मनाने जवळ आहेस,
सांत्वनाला आलेले शब्दही लाजरे झाले.
सावरीन स्वतःला मी हा शब्द पाळत होतो,
तू दिलेल्या शपथेचे जगण्याला आसरे झाले.
कधी तुला विसरण्या गर्दीत शिरू पाहिले,
तुझ्याविना आनंदाचे क्षणही बोचरे झाले.
डोळे मिटून जेव्हा तुझ्यात मी बुडलो,
मीपण विसरून तेव्हा मनही नाचरे झाले.
मध्यरात्रीस या आता कोणी सभोव नाही,
हृदयात कोंडलेल्या पाषानाचेही झरे झाले.
------------------------------- सौम्य