शब्द हरवले माझे
जेव्हा तुला बघितले
साडीत लपेटलेले सौंदर्य
जेव्हा हळूच डोळ्यात सांडले
बाहेर श्रावण बरसत होता
आत मात्र मला सतवत होता
मी मदहोश झालो तुझ्या बहुपाशात
घट्ट बिलगून घेतला जेव्हा
तुझ्या हातांचा विळखा
तुझ्या नजरेने दिला
मला थांबण्याचा इशारा
पण त्या सौंदर्याचे काय करू
त्या भावनांचं काय करू
संग मला त्या प्रेमच काय करू
जे अजूनही आहे माझ्या हृदयात...NI3