आज पुन्हा पाऊस आला,
आठवणींसारखा तुझ्या.
विसरलो विसरलो म्हणताना,
सरी आल्या कोवळ्याश्या.
धरून आडोसा -कोना,
शरीर लपून राहिले.
मनी आनंद झाला,
ते हात सोडून धावले.
नको नको म्हणताना,
मी हि भिजून गेलो.
मनाच्या मागे मागे,
गुपचूप निघून गेलो.
कुणास ठाऊक कधी,
हा पाऊस थांबेल.
किती दिवस आठवणींचा,
प्रवास असा लांबेल.
नको असा पाऊस वैगरे,
वादळ बनून येना.
माझ सारं उरल-सुरलं,
सोबत तुझ्या नेना.
--------------------------- सौम्य