एकेकाळची मैत्री
अगदी कालपर्यंत हे सारे माझे मित्रच होते
पेंद्यासुदाम्यासारखी, साथ निभावत होते।। १ ।।
स्वप्न डोळ्यात घेवून, शिखर जेव्हा गाठले
माझे यश पाहून, हे मित्रच जास्त नटले।। २ ।।
माझ्या डोळ्यात अश्रू, जर आघात यांना झाला
अनोख्या मैत्रीचा असा, प्रत्यय मीही दिला ।। ३ ।।
गरुडाची झेप घेऊन मी, उडत होतो आकाशात
दिपवून टाकले जगाला, प्रतिभेच्या प्रकाशात।। ४ ।।
खूपच उंच गेलो, अगदी ऐपतीपेक्षा
त्या उत्तुंग भारारीनेच, अशी केली दशा ।। ५ ।।
वेळ नव्हती आली, पण काळ येवून गेला
जिवंत ठेविले मात्र, पंखच घेऊन गेला ।। ६ ।।
सुखाच्या काळात भेटले, जिकडेतिकडे मित्र
आता दुःख वाटून घ्यायला, कुणी नाही कुत्रं ।। ७ ।।
आनंदाच्या क्षणी माझ्या, सोबत होते सावलीसारखे
काळरात्र मजवर येता, आज झाले पारखे ।। ८ ।।
-ARUN ZINJURDE