Author Topic: माझा एक करार  (Read 2079 times)

Offline praveen.rachatwar

 • Newbie
 • *
 • Posts: 17
 • Gender: Male
माझा एक करार
« on: October 16, 2011, 08:11:19 PM »
(माझ्या जीवनात 'मी आज जे काही आहे' त्याच श्रेय मी माझ्या आईनंतर "तिला" देतो. कसाही असो आज मी "तिच्या" मुळे आहे. ती माझ्या जीवनात नाही पण ही कविता "तिला" तिच्या वाढदिवसानिमित्त  (१६ ऑक्टो.)  समर्पित करतो.)चल आज आपण एक करार करू,
दुनियेतील सर्वकाही वाटून घेऊ,

सूर्योदयाची रम्य पहाट तुजला ,
रणरणत्या उन्हाच्या झळा त्या मजला,

बागेतले फुल पदरात तुझ्या,
अन सदर काटे रस्त्यात माझ्या,

ओठांवर तुझ्या स्मित हास्य खेळावं,
खार पाणी माझ्या डोळ्यातच रहावं,

तुझ्यासाठी रिमझिम पावसांच्या त्या धारा,
सगळं वाहून नेणारा तो पूर मला बरा,

यशाचा हर एक चढ तू चढावा,
चढानंतरचा उतार माझ्या वाट्याला यावा,

जीवनाच्या वाटेवरचा दूरचा रस्ता माझा,
त्याच रस्त्यावरील एकच विसावा तुझा,

तुझ्यासाठी ते चिंब पावसाळे,
जन्मभर मात्र माझ्या जीवाचे उन्हाळे,

काळोख चिरणारा दिवा तुझ्या घरात,
पण मी तसाच रहावं अंधारात,

मला हव्यात त्या जुन्या आठवणी,
तुजला गाण्यासाठी नवी-नवी जीवन गाणी,

तुझ्या नावे माझा श्वास अन स्पंदन,
बाकी माझ्याकडे ते अमर मरण.
                 
                -प्रवीण उत्तम राचतवार   
« Last Edit: October 16, 2011, 08:12:23 PM by praveen.rachatwar »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: माझा एक करार
« Reply #1 on: October 17, 2011, 11:56:58 AM »
तुझ्या नावे माझा श्वास अन स्पंदन,
बाकी माझ्याकडे ते अमर मरण.

Offline prashant_athawale

 • Newbie
 • *
 • Posts: 12
Re: माझा एक करार
« Reply #2 on: October 22, 2011, 10:15:46 AM »
sahi yaar

Offline Pournima

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Female
Re: माझा एक करार
« Reply #3 on: October 22, 2011, 02:34:56 PM »
kharach manala sparshun janari kavita

Offline sanjiv_n007

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male
Re: माझा एक करार
« Reply #4 on: October 23, 2011, 11:00:47 AM »
Zakkas......

Offline praveen.rachatwar

 • Newbie
 • *
 • Posts: 17
 • Gender: Male
Re: माझा एक करार
« Reply #5 on: October 28, 2011, 07:06:27 PM »
Thanks all

Offline manoj vaichale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 111
 • Gender: Male
Re: माझा एक करार
« Reply #6 on: October 28, 2011, 09:04:26 PM »
बाकी माझ्याकडे ते अमर मरण. 
kharach manala sparshun janari kavita