भेट ती झाली अशी कि
भेटणे झालेच नाही,
बोललो इतकेच कि
बोलणे झालेच नाही,
घ्यायचे होते डोळे तुझे,
या डोळ्यात भरून पूर्ण,
पण डोळे भरले असे कि,
पाहणे झालेच नाही,
स्वप्न प्याला हाती होता,
ओठही व्याकुळ होते ,
देवूनी सर्व काही
थोडेच घ्यायचे होते ,
ओंजळी केल्या ग रित्या ,
पण मांगने झालेच नाही,
भेट ग पुन्हा मला ,पण कुठे?
हे सांगणे झालेच नाही.