सांग ना ग...
आज हि तु मला आठवतेस का...
आज हि तु मला मनात साठवतेस का...
सांग ना ग...
आज हि आहेस का
तु तशीच माझ्या परीसारखी
आज हि आहेस का
तु तशीच मला स्वतःत हरवण्यासारखी
सांग ना ग...
आज हि तुझ्या डोळ्यात का
नकळत अश्रू बरसतात
घेऊन बघ ना ग मला मिठीत
मग बघ कसे अश्रू विरतात
सांग ना ग...
सकाळ, संध्याकाळ, रात्र, दुपार
काय मीच आठवतो तुला बेसुमार
आकार, उकार, होकार, नकार
काय माझाच येतो सारखा विचार
सांग ना ग...
आज हि आहे का
तीच जादू तुझ्या डोळ्यात मला बेन्धुंद करण्यासाठी
आज हि दरवळतो का
तो सुंगध तुझ्या सहवासात मला सामावून घेण्यासाठी
सांग ना ग...
आज हि होतेस का
तु बेचैन मला ऐकण्यासाठी
आज हि होतेस का
तु आतुर मला भेटण्यासाठी
सांग ना ग...
आज हि मी आकंठ बुडतो का
तुझ्या आसंवात
आज हि तु तदपतेस का
माझ्या विरहात
सांग ना ग...
आज हि तु लटके-लटके
रागावतेस का माझ्यावर
आज हि तु तेवढेच हटके
प्रेम करतेस का माझ्यावर
सांग ना ग...
आज हि तळमळतो का
जीव तुझा माझ्यासाठी
आज हि होतेस का
कासावीस माझ्यासाठी
सांग ना ग...
आज हि तुला कळतात का
माझ्या मनातील भावना
आज हि तुला दिसतात का
माझ्या डोळ्यातील वेदना
सांग ना ग...
आज हि तुटत का
मन तुझ माझ्यासाठी
आज हि रडतो का
आत्मा तुझा माझ्यासाठी
सांग ना ग...
आज हि तु कावरी-बावरी होतेस का
माझ्या मिठीत असताना
आज हि तु चिंब चिंब भिजतेस का
माझ्या आठवणीत रडताना
सांग ना ग...
आज हि तु अश्रू तिपतेस का
आसावलेल्या नजरेतून
आज हि तु खोटे हसू आणतेस का
निरागस चेहऱ्यातून
सांग ना ग...
आज हि तु तशीच स्वतःशीच वाद घालतेस का
मला miss करण्यासाठी
आज हि तु तशीच स्वतःशीच लाजतेस का
मला kiss करण्यासाठी
सांग ना ग...
आज हि तु रात्री-बेरात्री झोपेत बदबदतेस का
मी तुला का एकटे सोडून गेलो म्हणून
आज हि सकाळी तुला कुणी विचारत का
रात्री तु काय बडबडून गेलीस म्हणून
सांग ना ग...
आज हि तु स्वताला आवरतेस का...
आज हि तु स्वताला सावरतेस का...
आज हि तु क्षणाला क्षण मोजत जगतेस का...
आज हि तु दिवसाला दिवस जोडत जगतेस का...
सांग ना ग...
आज हि तु मला आठवतेस का...
आज हि तु मला मनात साठवतेस का...
प्रशांत धो. आठवले