प्रेम भंग
प्रेमाच्या दुभंगलेल्या अवस्थेत
जखमेंवर मीठ पडे
तशी तुझी आठवण येते गडे
काही कळेना, काही वळेना
तुझा विसर मला पडेना
सखी मैत्रिणी मी दूरावल्या
तुझ्या वाचून कोणीच रूचेना
कसला आजार हा लावूनी घेतला
याचा उपचार तूच असेना
आई-बाबा अनभिज्ञ यांजपासून
चेहरा पाहून उमजेल त्यांना
हस-या चेह-याचा मुखवटा
घाली मी वावरताना
--काव्यमन