तू अजुनही माझा आहेस का??
तू अजूनही तसाच आहेस का?
तुझं-माझं नातं तसच आहे का?
सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता ..
गुंता होतो..
खूप गुंता होतो..
तुला भोवताली शोधताना..
धुक्यात हरवलेली ती वाट शोधताना..
जीव एकवटून तुला आवाज देताना..
नि:शब्द शांततेत तुझ्या एका 'ओ' ची वाट पाहताना..
गुंता होतो..
गुंता होतो माझ्या मनाचा..
तुझ्या सावल्यांसोबत भरकटत जाणार्या,
माझ्या भावनांचा गुंता होतो..
तुझी वाट पाहता पाहता..
दिवस कधीच ढ्ळलाय,
सांज दाटून आल्याव्रर..
गुंता होतो..
तुझ्या आठवणींसोबत मोहोरलेल्या..
संवेदनांचा गुंता होतो..
त्या गुंत्यात गुरफटून मी..
हरवून जाते..
स्वतःचे श्वास थांबेपर्यंत..
गुंत्याच्या गाठी उलगडेपर्यंत झगडत राहते..
पन उकल होत नाही..
आता तसे माझे श्वासपण उरलेतच कुठे???
गुंता सुटेलच आता..
एक झट्का दिल्यावर ,
पूर्ण वीणच तुटेल..
मग ना उरेल गुंता ना गाठी..
माझ्या मंदावणार्या श्वासांसोबत..
विरुन जातील सारी नाती...
