Author Topic: विरहात या क्षणांना  (Read 1963 times)

Offline Rupesh Naik

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
  • शब्द ओशाळले भाव रेंगाळले....!!शब्द तुझे भाव माझे..!!
विरहात या क्षणांना
« on: November 07, 2011, 09:43:16 PM »
विरहात या क्षणांना
द्रावून या मनाला

नजरेत आस आता
पण विनय पांघरलेला॥ धृ ॥

दिवसात रात्र व्हावी
निमिषात निस्तरावी
नयनात आसवांचा
डोह हा साठवावा ॥१॥

तिमिरात चांदण्यांचे
अनपेक्षित कौतुक ते
तेजात  आठवणींना
क्लेश हा जाणवावा ॥२॥

सांजवेळ येतl दlरी
आठवणींची व्हावी स्वारी
हृदयात काहोलांचा
तटबंध हा फुटावा ॥३॥

विरहात या क्षणांना
द्रावून या मनाला ..
 :'( :'(...
« Last Edit: November 07, 2011, 09:51:01 PM by naikrupesh255 »

Marathi Kavita : मराठी कविता