सूर्योद्यासोबत तुला भेटायची आस गवसली,
अन् सूर्यास्ता सोबत तुझी साथ तुटली |
जमवले होते जे क्षण आणि ज्या आठवणी,
पुन्हा जाग्या झाल्या आणि तू सोबत नसल्याची उणीव मला भासली |
अशाच एका मंद सायंकाळी,
हातात हात घेऊन तुझ्यासोबत रमलेली मी,
आता डोळ्यात आसवे घेऊन तुझ्या सुखद आठवणी घेऊन परत चालली|
