होती मनात भीती तेच झाले
पुस्तक फोटोनिया परत आले
पान सर्व वेगळे झाले
असं वाटते, शब्द ही विस्फुरले
हाच का होता माझा गुन्हा
तर, नाही देणार पुस्तक कोणाला पुन्हा
अनेकाने हाताळले त्याला
ते सांगेल तरी कोणाला
फाटलेले पुस्तक चिटकवत आहे
पण हा छळ का त्याने साहे
शेवटी घ्यावे लागले वेगळे
पुस्तक नवीन आगळे
मज का नाही कळले
पुस्तक माझे मजपासून दुरावले
होती भीती तेच झाले
तेच झाले, तेच झाले
संध्या पगारे