रागवता येत का रे तुला
मला तरी नाही आठवत बाबा
रागवता येत का रे तुला
मग तो राग कधी दिसला का नाही मला
म्हणतोस कि तू रुसतोस
मग नजरेला नजर भिडताच का हसतोस
मला माहित आहे तुला नाही जमायचं
रागवून माझ्यावर नाही बोलायचं
रागवला जरी तरी भांडतच असतोस
जेणेकरून माझ्याशीच बोलतोस
पण तुझ्या रागावर उपाय माहित आहे मला
माझ्या गालावरील स्मित हास्याचा कळा
आज मी हसून हसून किती दमले
बोलशील काहीतरी म्हणून थांबले
आज असा कसा रुसलास बर
माझ हास्य जाऊ दे पण तुझ्या आईचे अश्रू बघतर खर
वाद तरी घाल माझ्याशी आज
आज तुला आलाय तरी कसला माज
तुझ्याच आईने सावरलय मला
तू नाहीस आत्ता असं सांगतेय मला
तुला मला हसताना पाहायचे आहे
तर तुला परत येण हि भाग आहे
आत्ता या गालांवर कधी नाही येणार ते हास्य
कारण मला नाही कळलं अजून तुझ्या जाण्याचं रहस्य
संध्या पगारे