मी काहीसा...
ठेवून मनाच्या कोपरयात तुला
जगलो मी काहीसा...
नाही, तू माझी नाहीच म्हणत,
जगाशी खोट बोललो मी काहीसा...
क्षण क्षणाला आठवून तुला,
तळमळलो मी काहीसा...
नाही हक्क तुझ्यावर माझा,
म्हणून हळहळलो मी काहीसा...
देवाजवल ओंजल पसरून मागताना,
मागितले तुझे प्रेम काहीसे...
तरीही पदरात पडले नाही माझ्या,
म्हणून रडलो मी काहीसा...
बघताना दुसरयासंगे तुला,
खटकले काहीसे मनात माझ्या...
तुझा हात त्याच्या हातात पाहून,
मी डलमळलो काहीसा...
प्रवास संपला आता,
पण सांगू न शकलो काहीच तुला...
जातानाही तुझ्याच तसवीरिकडे पाहून,
' माझ प्रेम........' पुटपुटलो काहीसा....