!!!!तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!!
वाटलं साथ असेल जन्मोजन्मीची
नातं असेल मनोमनीच
आधार असेल जीवनाचा
पण अशा काही विचाराचा
तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!!
वाटलं असशील अमावस्या रात्रीची चांदणी
जी वाट दाखवेल माझ्या मुक्कामाची
आधार असेल माझ्या प्रत्येक अंधाऱ्या रात्रीचा
पण अशा काही वाटेवर जाण्याचा
तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!!
वाटलं असेल मी एक चंद्र तुझा
सुखावशील शीतल छायेत माझ्या
फक्त तो तूला नि तुलाच भासणारा
पण तुझ्या त्या आकाशात उगवण्याचा
तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!!
वाटलं असेल संगती
मी तुझ्या प्रत्येकक्षणी
साथ असेल पदोपदीची
आधार असेल प्रत्येक क्षणाचा
पण अशा काही चिरकाल क्षणाचा
तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!!
"हणमंत तरसे"