Author Topic: निरोप  (Read 1928 times)

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
निरोप
« on: December 01, 2011, 05:40:08 PM »
इथे तरी तू चूक कबूल करावीस
किमान आणि खूप किमान
इथेतरी...
खूप  झाले दिवस दाखवून
तुझे माझे दिवस आठवून
जे काही सुखावलंस.. त्या  सुखांची
तू परतफेड करतीयेस
अगदी डोळे ओले करेपर्यंत
काही एक हक्क  नाहीये तुझा
एवढं सगळं देऊन परत हिरावून घेण्याचा
इतकी कशी निष्ठुर तू
सगळंच कसं  विसरलीस
एका क्षणात
जमलंच कसं तुला
अजून कळवळतोय तुझ्या जाण्याने
अजून  भान थाऱ्यावर नाहीये
विसरतोय.. अडखळतोय.. धडपडतोय
वर येतोय.. असं  वाटतंय.. जमतंय.. जमत नाहीये..
बाहेर तर यावंच लागणार
वाट पाहणारेही आहेत अजून
तू सोडून
ज्यांना  मी सोडलं
तुला धरून
खूप झालं तुझं प्रेम
खूप झाला दिखावा
तुझ्यासोबत  नाही तर तुझ्या आठवणींसोबतही नाही
तुझ्या आठवणींसोबत तर नक्कीच नाही
 
-  रोहित

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: निरोप
« Reply #1 on: December 02, 2011, 11:10:11 AM »
chan....

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
Re: निरोप
« Reply #2 on: December 02, 2011, 01:26:52 PM »
thank you....