Author Topic: आपला चहाचा कप..  (Read 1903 times)

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
आपला चहाचा कप..
« on: December 10, 2011, 11:06:21 AM »
तुला आठवतं ते आपलं नेहमीचं हॉटेल
आणि तेच सर्वात  मागचं टेबल ..
त्यावर आज थोडी धूळ साचलेली.
हळुवार हात फिरवला ..तर  ..
तेच तू काढलेलं आपलं छोटंसं गाव .....आणि  त्यावर लिहिलेलं दोघांचे नाव....!
अन ..मन माझं पुन्हा एकदा मागे  गेलं..
अगदी एकदम सर्वकाही काल घडल्या सारखं
जाळीदार पानावर पहाटेचं दव पडल्यासारखं
मला तुझं प्रेम कळावे  म्हणून तू केलेला शब्दांचा खेळआणि  सर्व समजूनही मी राहिलेलो अबोल ....!
मला आवडणारा ड्रेस तू घातलेला  ..
पण जाणवू दिला नाही मी प्रसंग माझेवर बेतलेला ..
मलाही समजत  होतं..
मी आलेवर ..मी येते म्हणणारी तुझी मैत्रीण हुशार ..आणि तू  दिसलेवर माझे मित्रही होणार लगेच पसार ..
रोज अजून थोडावेळ थांबू ना  .. बोलणारी तू ...
अन घरी जाण्याची घाई करणारा मी ..
दोघामध्ये एकच  घेतलेला तो चहाचा कप ...!तोही केविलवाणे हसत बघायचा माझेकडे ....!
डोळ्यात  डोळे घालून ..आयुष्यभर साथ देशील ..
असे विचारणारी तुझी भावूक नजर ..
प्रतीक्षा  माझ्या उत्तराची ..
अन ..उत्तर ऐकताच ..केलेली घाई अश्रू   लपवण्याची ....!!
तुला नाही म्हणून गेलो तुझे पासून दूर ..
घरी  आलेवर भरून आला अश्रूंचा पूर ..
आता चहाच्या चटक्याने भानावर आलो ...स्वप्नं सारे भूतकाळात विसरून गेलो ..
पण ..
या सगळ्यातून बाहेर आलेला  मी ..
कायम तुझेसाठी कुढत आहे ..
आणि त्या चहाच्या कपात अजूनही ..तुझंच  प्रेम शोधत आहे .....!!


- रोहित

Marathi Kavita : मराठी कविता


Saurabh yeole

 • Guest
Re: आपला चहाचा कप..
« Reply #1 on: December 10, 2011, 12:48:27 PM »
Heart touching

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
Re: आपला चहाचा कप..
« Reply #2 on: December 10, 2011, 12:50:43 PM »
 :)

Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
Re: आपला चहाचा कप..
« Reply #3 on: December 10, 2011, 07:02:03 PM »
khup chan

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आपला चहाचा कप..
« Reply #4 on: December 13, 2011, 03:05:17 PM »
kavita chan aahe..... pan nahi ka mhnalat??????????????