स्मरते अजुनी भेट अपुली स्मरे तुझा सहवास
आठवते रे रूप तुझे अन फुललेला तव श्वास
भेटण्याचे निमित्त काही अन शोध नवा हमखास
तव भेटीची नित्य ओढ मनी तोच ध्यास
तूच निराळा असा कसा रे तोडशी विश्वास
स्नेहबंध ते विसरुनी सारे घेशी जणू सन्यास
तुझी यशाचा अन ध्येयाचा मला सारखा ध्यास
तुझ्या स्वप्नात मीच गुंतले होते रे हमखास
वेड्या परी तू येउनी मजला जेव्हा उचलुनी घेशी
मन माझे पिसात नाचे तुझ्या नव्या यशाशी
अन अचानक निरोप घेउनी दूर देशी तू गेला
मोबाईलचा ध्वनीही आता सोबतीस ना उरला
तुझे हसणे तुझे छेडणे स्मरूनी दिस ढकलते
मंगेश कोचरेकर