आज अचानक मनात, काळजीच सावट दाटलंय
त्यातच मन पुन्हा तुझ्या, जुन्या आठवणीत साठलंय
का मला पुन्हा पुन्हा, सारखी तूच आठवतीयेस
वेड्या माझ्या मनाला, तू हुरहूर लावून जातीयेस
जगत होतो एकटाच मी, माझ्या स्वतंत्र पद्धतीने
अचानक तुझ्या आठवणीने,या रुक्ष वृक्षाला फुलली पाने
रुक्ष राहणेच पसंत होते मला, नको होता तो बहर
बहर गेल्यावर प्रत्यक्ष, वृक्षच साथ देतो आयुष्यभर
मन माझं पुन्हा पुन्हा, त्याच आठवणीत गुंतत चाललंय
त्या बेढब वृक्षाला आता, सुंदर पाना फुलांनी जखडलंय
तुझ्या फक्त आठवणीने त्याला , जगण्याची उमेद मिळालीये
आठवणी संगेच शेवटपर्यंत राहण्याची, शपथ त्याने घेतलीये
शपथ त्याने घेतलीये