Author Topic: विसरलोय मी....  (Read 2606 times)

Offline dhanaji

 • Jr. Member
 • **
 • Posts: 91
विसरलोय मी....
« on: December 28, 2011, 12:22:09 AM »

विसरलोय मी...
तिची न माझी झालेली पहिली भेट
विसरलोय मी...
जी मनात बसली होती एकदम थेट

विसरलोय मी....
तिने त्या दिवशी घातलेला अबोली कलरचा ड्रेस
विसरलोय मी....
तेव्हाचे तिचे वार्यावर उडणारे काळे केस

विसरलोय मी....
सरळ मनावर वार करणारा तिचा एक कटाक्ष
विसरलोय मी....
तेव्हाची रिमझिम पावसाची साक्ष

विसरलोय मी....
तिच चिडून मला खडूस म्हणन
विसरलोय मी....
लटक्या रागात सुद्धा प्रेमान काळजी घेण

विसरलोय मी....
दोघांनी घेतलेला वाफाळलेला चहाचा कप
विसरलोय मी....
तिने दिलेलं चाफ्याचं रोप

विसरलोय मी....
मला सतवण्यासाठी तिच मुद्दाम अबोल राहण
विसरलोय मी....
मला बोलता बोलता निशब्द करण

विसरलोय मी....
आमच्यात भांडणाच, मैत्रीच, आणि .....प्रेमाचं बोलण झालेलं
.
.
.
आणि
विसरलोय मी....
तिने मला " मला विसर " म्हटलेलं....

---
सागर लांडगे
२१/११/२०११

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dhanaji

 • Jr. Member
 • **
 • Posts: 91
Re: विसरलोय मी....
« Reply #1 on: December 28, 2011, 12:23:17 AM »


तिला विसरायचच
हे आता मनोमन पक्क ठरवलं होत..!
.
.
तिला विसरण्यासाठी....
तिने आतापर्यंत पाठवलेले
७६२ MSG ... ,
६६८ MAILS ...
आणि
एक चाफ्याचं रोप
सर्व काही क्षणार्धात नष्ट केले.....

पण..
.
.
पण,
तिची डोळ्यात साठवलेली छबी,
कानावर पडलेले शेवटचे शब्द,
आणि..
मनाच्या कोपर्यात जतन केलेल्या असंख्य आठवणी
कशा काढून टाकणार..?
याच उत्तर तर मला मिळालंच नाही...!

---
सागर लांडगे


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: विसरलोय मी....
« Reply #2 on: December 28, 2011, 10:47:16 AM »
आणि
विसरलोय मी....
तिने मला " मला विसर " म्हटलेलं....


kya baat hai....

Dipak Bavaskar

 • Guest
Re: विसरलोय मी....
« Reply #3 on: January 04, 2012, 07:08:13 AM »
khup chaan, ani mitra hi kavita me fb var past karto tuzya navasahit,chalel na

Offline Pravin5000

 • Jr. Member
 • **
 • Posts: 180
 • Gender: Male
Re: विसरलोय मी....
« Reply #4 on: January 04, 2012, 12:22:25 PM »
विसरलोय मी....
आमच्यात भांडणाच, मैत्रीच, आणि .....प्रेमाचं बोलण झालेलं
.
.
.
आणि
विसरलोय मी....
तिने मला " मला विसर " म्हटलेलं....


kya baat hai yaar.... awesome.....
:-[

Offline unicketan

 • Newbie
 • *
 • Posts: 10
 • Gender: Male
 • Ketan Meshram
Re: विसरलोय मी....
« Reply #5 on: January 07, 2012, 11:40:27 AM »
Khup chan.. Apratimm.

Walkoli Gopichand

 • Guest
Re: विसरलोय मी....
« Reply #6 on: January 08, 2012, 03:40:18 PM »
Ashach karat ja .
Mast kartos kavita !