Author Topic: दोन क्षणांची साथ होती...दोन क्षणाचा स्पर्श होता  (Read 3818 times)

Offline dhanaji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 91

दोन क्षणांची साथ होती
दोन क्षणाचा स्पर्श होता
दोन क्षणाचा स्पर्श तो
शेवटी अधूराच राहिला

त्या स्पर्शाचा पुन्हा आता
रोमांच उभा राहणार नाही....
त्रास होतोय मनाला..पण,
या हातांनी कविता पुन्हा लिहिणे होणार नाही

दोन क्षणाचं बोलण होत
दोन क्षणाचं ऐकण होत
दोन क्षणाच बोलण
शेवटपर्यत अव्यक्तच राहिलं

दोन क्षणाच ते शेवटच बोलण आता
कधीच व्यक्त होणार नाही....
त्रास होतोय मनाला..पण,
या हातांनी कविता पुन्हा लिहिणे होणार नाही

दोन क्षण हवे होते तिला
दोन क्षण हवे होते मला
दोन क्षणाच्या गोष्टी सार्या
दोन क्षणात हवेत विरून गेल्या

मिळालेल्या त्या दोन क्षणांची जाणीव
तिला कधी झालीच नाही....
त्रास होतोय मनाला..पण,
या हातांनी कविता पुन्हा लिहिणे होणार नाही

--
सागर लांडगे

Marathi Kavita : मराठी कविता


Supriya k.

  • Guest
Khupach chhan ahe kavita sagar..pan kavita karan sodu nako.

Offline Kiran Mandake

  • Newbie
  • *
  • Posts: 41
  • Gender: MaleTRUPTI KADAM

  • Guest
दोन क्षणांची साथ होती
दोन क्षणाचा स्पर्श होता
दोन क्षणाचा स्पर्श तो
शेवटी अधूराच राहिला

त्या स्पर्शाचा पुन्हा आता
रोमांच उभा राहणार नाही....
त्रास होतोय मनाला..पण,
या हातांनी कविता पुन्हा लिहिणे होणार नाही

दोन क्षणाचं बोलण होत
दोन क्षणाचं ऐकण होत
दोन क्षणाच बोलण
शेवटपर्यत अव्यक्तच राहिलं

दोन क्षणाच ते शेवटच बोलण आता
कधीच व्यक्त होणार नाही....
त्रास होतोय मनाला..पण,
या हातांनी कविता पुन्हा लिहिणे होणार नाही

दोन क्षण हवे होते तिला
दोन क्षण हवे होते मला
दोन क्षणाच्या गोष्टी सार्या
दोन क्षणात हवेत विरून गेल्या

मिळालेल्या त्या दोन क्षणांची जाणीव
तिला कधी झालीच नाही....
त्रास होतोय मनाला..पण,
या हातांनी कविता पुन्हा लिहिणे होणार नाही

--