Author Topic: किती गेले दिवस तुझ्याविण  (Read 1497 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76


किती गेले दिवस तुझ्याविण
शब्द एकही नाही सुचला,
श्वास एकही नाही चुकला,
चुकलो चुकलो सारे हे क्षण,
कविते जगलो किती तुझ्यावीण

रंग उगवतीचे न्याहाळत बसलो,
मावळतीला उदास हसलो,
फुललो नाही, नाही सुकलो,
कविते जगलो किती तुझ्यावीण ..

अश्रू सारे आतच सुकले,
नाही उजळले कधीच डोळे,
मिटले ओठ सुकून गेले,
शब्द जाहले वैरी केवळ,
कविते जगलो किती तुझ्याविण..

ओळख एकही टिकली नाही,
तार कुठेही जुळली नाही,
स्वगत सारे मूक आक्रंदन,
कविते जगलो किती तुझ्यावीण..

शब्द निसटले, अर्थ उलटले,
नाती सरली माती उरली,
कितीक स्वप्ने तशीच पुरली,
झाले सारे जगणे निष्फळ,
कविते जगलो किती तुझ्यावीण...

एक आसरा तुझाच होता,
एक पहारा तुझाच होता,
तोही उठला, सुटलो आपण,
कविते जगलो कसा तुझ्यावीण...

उन कोवळे कधीच नव्हते,
मस्त चांदणे दूरच होते,
तहान मोठी आत तळमळे,
मृगजळयात्रा अवघे जीवन,
कविते जगलो किती तुझ्यावीण...

-- Author Unknown