Author Topic: मला काहीच वाटल नाही  (Read 1796 times)

Offline bava1984

 • Newbie
 • *
 • Posts: 6
मला काहीच वाटल नाही
« on: January 16, 2012, 12:53:57 PM »
ज्या वाटेवर शपथ घेतलीस
पुन्हा कधी ना येण्याची
त्या वाटेवर मला का शिक्षा
आनंदने गाण्याची

पोकळ शब्द, सुखात राहा
अन विसरून जा वैगरे
नजर उठवून सांगायचे
पाठवले का ऐरेगैरे

पुन्हा आठवू नको कधीही
माझे मीच बघून घेईन
विसरलेलो एकटे जिणे
पुन्हा एकदा जगून घेईन

पुन्हा पाठवू नको कुणाला
मध्यस्था चा झेंडा घेऊन
शपथ सांगतो तुझी अखेरी
कानाखाली देईन ठेवून .

नको वेगळी सहानुभूती
आभाळ काही फाटल नाही
खरच सांगतो शपथ तुझी
मला काहीच वाटल नाही

जमला तर जपून राहा
स्वार्थाचा घेत पाय रव
जगात मीच एकटा आहे
बाकी सगळे टोळ भैरव

एकच कर जमल तर
विनंती नाही अर्ज आहे
आसवे धाडून दे माघारी
मला त्याची गरज आहे
----------- भूषण दत्ताराम भुवड
           पनवेल
           ९७७३०६७९३४

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मला काहीच वाटल नाही
« Reply #1 on: January 16, 2012, 05:14:44 PM »
mast.....

bhushan bhuwad

 • Guest
Re: मला काहीच वाटल नाही
« Reply #2 on: January 18, 2012, 12:23:12 PM »
Thank you, Sir

Offline raghav.shastri

 • Jr. Member
 • **
 • Posts: 62
 • Gender: Male
Re: मला काहीच वाटल नाही
« Reply #3 on: January 18, 2012, 09:15:13 PM »
नको वेगळी सहानुभूती
आभाळ काही फाटल नाही
खरच सांगतो शपथ तुझी
मला काहीच वाटल नाही... :( :(