Author Topic: आठवण जुन्या क्षणांची  (Read 1851 times)

Offline MobiTalk9

  • Newbie
  • *
  • Posts: 6
  • Gender: Male
    • MobiTalk9 : A2Z Marathi MP3 Songs
आठवण जुन्या क्षणांची
« on: January 22, 2012, 10:32:27 AM »
येईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची
काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची
येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ...
डोळ्यांना आठवण येईन त्या रात्रीची
भासेल गरज तुला माझ्या स्पर्शाची
येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची...
वाटेन भीती तुला त्या अंधार्या रात्रीची
सवय नसेल एकट्याने रात्र जगण्याची
येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ...
समजेल का व्यथा वाहणाऱ्या अश्रूंची
होईल का पाणी बंद तुझ्या डोळ्याची
येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ...
बंद करून डोळे विचारशील प्रश्न स्वताच्या मनाशी
का खेळत आलो मी इतरांच्या भावनेशी
होईल का आठवण तुला माझ्या प्रेमाची
येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची

Marathi Kavita : मराठी कविता