Author Topic: तू...  (Read 1215 times)

तू...
« on: February 01, 2012, 02:29:58 AM »
स्मरते ती पाउलवाट
जेथे तू आलीस माझ्या बाहूत
काळेभोर केस तुझे
माझ्या खांद्यावर जेथे ओघळलेत

पडताच हात तुझा हातावर
भरून निघे काळजाची भेग
एका स्पर्शात तुझ्या
होता सहस्त्र मिठीचा आवेग

अजूनही जाणवतो ओठास माझ्या
तुझ्या ओठाचा अधीर स्पर्श
फिरवताना नग्न छातीवर हात तुझ्या
होतसे रोमरोमी हर्ष

आपल्या एकांत समयी होता
माझा उर तुझ्या उरावर आवळलेला 
जसा हिरव्या रानात
नाग नागीणीस लपेटलेला

उजडे माझी प्रत्येक पहाट
पाहून तुझा भिजलेला चेहरा
जगत असे दिवसभर घेवून
त्या एका क्षणाचा सहारा

पण आजच्या तुझ्या
वागण्याचा अर्थ मला कळला नाही
स्पर्शण्या मजला तुझा
हात कसा तरसला नाही

हसण्याचा आवाज  तुझ्या
दिवसभर घुमला कानात
त्यात वा बोलण्यात
मजविषयी प्रीती नव्हती तिळमात्र

मी असताना सभोवती
होतीस तू तुझ्यातच मग्न
कळून चुकले मला कि
ती तू नसून होते तुझे दिवास्वप्न-- अनुराग गुंडाप्पा
                                                 shabdmuke.blogspot.in
« Last Edit: February 02, 2012, 09:53:20 PM by GpaSSion »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: तू...
« Reply #1 on: February 01, 2012, 12:44:39 PM »
hmmmmm!!!