Author Topic: शेवटचा स्पर्श...  (Read 3075 times)

शेवटचा स्पर्श...
« on: February 05, 2012, 12:34:44 PM »
मनातले मनातच राहून गेले
ओठातले शब्द ओठातच विरले
ह्रिदयाच्या उंबऱ्यावर बसून वाट पहिली तुझी
माहित असूनही, तू ओलांडणार नव्हतीस कधी
वाट पाहून तुझी दारावरचे तोरण ही सुकले
मनातले मनातच राहून गेले

आलीस जवळ कि मी माझ्यातच नसे 
तू माझी अन मी तुझाच भासे
तुझा मनापासून हसणं खळखळून
मला नकळत गमतीने जवळ घेवून
पाहिलेस का कधी ? माझ्या डोळ्यात तूच दिसे
आलीस जवळ कि मी माझ्यातच नसे

माहित नसेल मी तुलाच मानलं सर्वस्व
पण सांगला न कुणा हरवून माझा अस्तित्व
मनात का होईना तू आजही आहेस माझी
मानेल अखेरपर्यंत जरी नसेल परवानगी तुझी
दुरावा तुझा यापुढे ही घेईन माझी परीक्षा सत्व
माहित नसेल मी तुलाच मानलं सर्वस्व

असते प्रत्येकाची तशी माझीही तूच होतीस प्रेममूर्ती पहिली
मी घेणाऱ्या श्वास सुमनांची माला ही तुलाच वाहिली
तुला सांगताना नेहमी सुकायची त्यातली फुले
आनंद एवढाच, माझ्याच अंगणी वाढलीत त्या फुलझाडाची मुळे
उरलेल्या तुझ्या फाटक्या आठवणीतच माझ्या मनाची बाग नटली
असते प्रत्येकाची तशी माझीही तूच होतीस प्रेममूर्ती पहिली

दोष म्हणावा तरी कुणाचा, तुझा, माझा का नियतीचा
मी तुला प्रथम पहिले का त्या वेळेचा
मला सांगायला मार्ग नव्हता, का तुला कळायला मार्ग नव्हता
का असाच हा चंद्र पृथ्वीभोवती फिरणार होता
आता गेल्यावर तू का गुदमरतो श्वास माझा
दोष म्हणावा तरी कुणाचा, तुझा, माझा का नियतीचा

उरली फक्त ती जाणीव तुझ्या शेवटच्या स्पर्शाची उबदार
तुझ्या हाताची अन गोऱ्या खांद्यावरील केसांची काळेशार
फुटेल गं छाती माझी तुझ्यावर केलेल्या प्रेमाने आतल्या आत
काठोकाठ घागर भरून ओतलेस तू प्रेम दुसऱ्याच्या घरात
पण कायमचा रिकामा केलेला हा प्रेमप्याला आता मोडीवर जाईल भारोभार
उरली फक्त ती जाणीव तुझ्या शेवटच्या स्पर्शाची उबदार

                              ....अनुराग   
                  shabdmuke.blogspot.in
« Last Edit: February 06, 2012, 10:04:24 PM by GpaSSion »

Marathi Kavita : मराठी कविता

Police

  • Guest
Re: शेवटचा स्पर्श...
« Reply #1 on: February 05, 2012, 02:33:39 PM »

Offline mahesh4812

  • Jr. Member
  • **
  • Posts: 274
Re: शेवटचा स्पर्श...
« Reply #2 on: February 06, 2012, 01:50:20 PM »
excellent

Offline UNREVEALED MYSTERY

  • Newbie
  • *
  • Posts: 43
Re: शेवटचा स्पर्श...
« Reply #3 on: February 08, 2012, 12:03:06 PM »
pahiliprem murti... hi kalpana khup aavdali

amol joshi

  • Guest
Re: शेवटचा स्पर्श...
« Reply #4 on: February 10, 2012, 12:45:36 AM »
class yar mitra kharach khup sunder aani jivotla aahe tu hyachat he kalta......aagdi manatla chorlas buwa......

rshrikantr

  • Guest
Re: शेवटचा स्पर्श...
« Reply #5 on: March 01, 2012, 12:13:41 PM »
https://www.facebook.com/marathikavita/posts/317558568279445
more comments on FB too...
[/quote