Author Topic: एकदा वळली असतीस तर.....  (Read 2698 times)

एकदा वळली असतीस तर.....
« on: February 26, 2012, 12:57:36 AM »
तू मागे वळून न पाहता गेली तो दिवस
दिवस कि काळ रात्रीचा  पहिला प्रहर
तुझ्या आयुष्याची झाली नवी सुरुवात
पण तू केलेल्या माझ्या शेवटाने केला कहर

तू तर जात होतीस सासरी
ठेवून पावले माझ्या उरी
पायदळी तुडवताना पाहिलस  का ?
अक्षताही माझ्या अश्रुने नाहत होती

जाताना तुझा कंठ आला होता दाटून
रडताना तू शोधात होतीस प्रत्येकवेळी नव्या कुणाला
पण मला मागून तर पाहायचं होतं
अगं वेडे काळीज दिलं असतं तुझ्या उशाला

तू तर फक्त आसवं गाळत होतीस होतीस
ह्रिदय पिळून रक्त निघत होतं माझं
तुझी मिठी होती केवळ तुझ्या आपल्यांसाठीच
आता पाहूनच जगायचं होतं परकं आलिंगन तुझं

तुझ्या  केवळ एका नजरेसाठी बनलो होतो भिकारी
एकदा पाहिलं असतास तर समजून परकं
उरली नसती एकही खंत आयुष्यात अन
कुरतडलेल्या माझ्या जीवनाला लागली असती रेशमी ठीगळं


                                        .....अनुराग 
                                  shabdmuke.blogspot.in

Marathi Kavita : मराठी कविता


Offline kalpanabhise

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Re: एकदा वळली असतीस तर.....
« Reply #1 on: February 26, 2012, 02:31:06 PM »
1 ch no...khup ch bhavli...keep it up.