Author Topic: माझ्या चारोळ्या  (Read 1139 times)

Offline kalpana shinde

  • Newbie
  • *
  • Posts: 17
माझ्या चारोळ्या
« on: March 06, 2012, 02:51:41 PM »
जेव्हा माझ्या नसानसात..
[/color]तुझे प्रेम भिनले होते..

तेव्हाच माझ्या जीवनात..
 
नशिबाचे वारे उलटे फिरले होते..


प्रेम केले होते तुझ्यावर..

खूप खूप मना पासून..

मला काय माहित एक दिवस..

तोडेल ते मला आपल्या माणसांपासून..


तुझे प्रेम मला समजले नाही..

 
हीच मनात एक खंत आहे..

प्रेम नवता तर स्वार्थ आहे..

समजून मी आज शांत आहे..


लग्न म्हणजे खेळ नसतो..

 
हे तुलाहि माहित होते..

तरीही झुगार खेळलास तू..

कारण तुला मला हरवायचे होते..कश्याला राहू मी तुझ्या..

खोट्या या बंधनात..

लढेल मी स्वतहा एकटी..

गरज नाही तुझी माझ्या जीवनात..


प्रेम तर सर्वच करतात..

 
चुका पण सर्वान कडून होतात..

पण तुझ्या चुकांवर पांघरून..

घालणे नाही माझ्या हातात..


प्रेमात सर्व माफ असते..

असे मी ऐकले होते..

पण तुला माफ करणे..

हे माझ्या मनाला पटत नव्हते..


तू तुझा सुखी रहा..

 
मी माझी सुखी राहीन..

आता या जगाला मी..

माझ्या डोळ्याने पाहीन


कल्पना शिंदे (मोना )

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
Re: माझ्या चारोळ्या
« Reply #1 on: March 06, 2012, 04:40:28 PM »
Very Nice Poem ..........Mona ..... :)